शेअर मार्केट काय आहे व ते का केले पाहिजे?
share market information in marathi pdf:
एखादी कंपनी मोठी होऊ इच्छिते, तेव्हा त्या कंपनीला आणखी पैशांची गरज असते. पण जर त्या मालकाकडे तेवढे पैसे नसतील तर तो काय करू शकतो. पहिली गोष्ट तो बँकेकडून किंवा इतर ठिकाणांहून कर्ज घेऊ शकतो दुसरी गोष्ट तो व्याजाने पैसे घेऊ शकतो. मग तो त्याच्या काही गोष्टी विकून पैशांची जमवा जमव करू शकतो. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला एक प्रकारची रिस्क असतेच ती म्हणजे व्याज देण्याची विकलेल्या गोष्टी परत मिळविण्याची किंवा जर कंपनीची वाढ नाही झाली तर घेतलेले कर्ज फेडण्याची. त्यावर एक उपाय तयार करण्यात आला तो म्हणजे
Share market
शेअर मार्केट काय आहे,व ते कसे काम करते
सर्वात आधी शेअर मार्केट ची माहिती जाणून घ्या, जर एखादी कंपनी किंवा व्यवसाय स्थापन करायचा असेल तेव्हा आपण काय करतो आधी बँकेकडून कर्ज घेतो किंवा आपण साठवलेले पैसे वापरतो, आणि त्या व्यवसायाची स्थापना करतो मग आपण त्यावर भरपूर कष्ट घेतो आज त्या व्यवसायाला एक विशिष्ट उंचीवर घेऊन जातो. आता त्या व्ययाला आपल्याला अजून वरच्या पायरीवर घेऊन जायचं आहे मग त्यासाठी अजून पैश्याची गरज पडणार अजून भांडवल लागणार, पण तेव्हा आपल्याला खूप मोठ्या भांडवलाची गरज पडते, तेवढा भांडवल आपण कर्ज म्हणून घेणं एक प्रकारची रिस्क च असेल किंवा आणखी कोणाकडून मागून घेतले तर त्याची परतफेड करावीच लागेल. पण शेअर मार्केट एक अशी गोष्ट आहे जिथं कोणतीही कंपनी पैसे तर घेते पण ते पैसे परत द्यायची गरज नसते, ते कसं ते आपण बघू,
कंपनीला जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा ती कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट होण्यासाठी SEBI ( SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA)*कडे अर्ज करते, मग त्या कंपनीवर पूर्ण अभ्यास करून झाल्यावर सेबी कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर ती कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट होते ज्याला IPO ( INITIAL PUBLIC OFFERING ) * म्हणतात. कंपनी त्या येणाऱ्या पैश्यांच्या बदल्यात हिस्से म्हणजेच शेअर्स देऊ करते. ती कंपनी एका विशिष्ट किमतीवर शेअर देते आणि मग पुढे त्या शेअर साठी असलेल्या डिमांड आणि सप्लाय वरून ठरते की शेअर वाढेल की घटेल.
share market information in marathi pdf
शेअर मार्केट मध्ये एवढा फायदा आहे तर मग त्याला जुगार का म्हणतात त्याच कारण अस की जुन्या काळी जेव्हा शेअर मार्केट भारतात नव्याने आलेसे होते की जे काहीच अभ्यास न करता शेअर मार्केट मध्ये भरपूर पैसे गुंतवायचे मग त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं आणि मग ते दुसऱ्या लोकांना अस सांगायचे की शेअर मार्केट चांगलं नाही त्यात खूप नुकसान आहे. पण हे कधी नाही सांगितलं की मी अभ्यास न केल्यामुळं मला नुकसान झाले. या काही करणांमुळे आज शेअर मार्केट बदनाम आहे.
पण आता एक गोष्ट बघा की सगळ्यात जास्त अपघात टू व्हिलर चे होतात पण तरी आपण ती चालवणं सोडतो का ? नाही कारण आपल्याला माहितीये आपण त्यात पारंगत आहोत आणि आपण ती व्यवस्थित हाताळू शकतो कारण आपण ती चालवायला शिकलेलो असतो, मग शेअर मार्केट च पण असच आहे, ना शिकता त्यात उतरलो की अपघात / नुकसान तर होणार च पण जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला शिकलो तर आपण त्यात पारंगत होऊच शकतो. आणि या शेअर मार्केट मुळेच आज किती तरी अबाधीश लोक घडवली. त्यात प्रामुख्याने नाव येत ते म्हणजे वॉरेन बफे यांचे जे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांनी शेअर मार्केट मधून च ती पायरी गाठली. तसेच भारतातले उदाहरण घ्यायचे झाले तर राकेश झुंझुंवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे बोलले जाते. त्यांची आज १३००० कोटींची संपत्ती आहे. म्हणूनच शेअर मार्केट अभ्यास करणाऱ्यांसाठी ते एक वरदान च आहे असच म्हणावं लागेल
शेअर मार्केट जगातील सर्वात उत्तम व्यवसाय (Share Market World Best Business)
share market information in marathi pdf:
शेअर मार्केट ची वेळ ही सकाळी ९ ते दुपारी ३.३० पर्यंत असते.
ह्या व्यवसायात कुठलीही स्पर्धा (Competition) नसते
तसेच तुम्ही ह्यात तुमच्या मनानुसार भाग घेऊ शकतात व मनानुसार बाहेर पडू शकतात.
कामात तुम्हांला कुठल्याही गणवेशाची गरज नसते
ह्या व्यवसायात तुम्हांला कुणी Judge करू शकत नाही.
तुम्ही कोठेही असो तुम्हाला कुठेपण बसून काम करता येऊ शकते.
कुठल्यापण कारणासाठी तुमची उपस्थिती गरजेची नसते
तुम्ही तुम्हांला पाहिजे तेव्हा सुट्टी घेऊ शकतात.
शेअर मार्केटमध्ये तुम्ही तेजीतसुद्धा पैसे कमावू शकतात आणि मंदी सुद्धा.
बघितल्या गेलं तर दररोजच्या कामानुसार हे काम सोईस्कर आहे. म्हणून आपण म्हणू शकतो शेअर मार्केट जगातील सर्वात उत्तम व्यवसाय आहे.
share market information in marathi pdf
गुंतवणुकीमध्ये तुम्हाला पैसे लगेच भेटत नाही ,त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीला वेळ द्यावा लागतो
गुंतवणूक ही long term म्हणजेच जास्त काळासाठी बनलेली आहे
यात रिटर्न्स पण जास्त भेटतात
शेअर मार्केट हा पैशांचा खजिना आहे. बरेच लोक त्यातून पैसे कमवत आहे,परंतु शेअर मार्केट चा पूर्ण अभ्यास नसल्याने आपल्यासारखेच यात मागे पडत आहे . त्यामुळे आपल्याला ही विनंती आहे की शेअर मार्केट शिकण्यासाठी आपल्या आर्टिकल ला नेहमी अपडेट रहा
whatsaap group link
https://chat.whatsapp.com/GlVQvG9wVwwEjmYkB0cPsG
धन्यवाद ….
3 thoughts on “शेयर मार्केट म्हणजे काय ? | शेअर मार्केट चा संपूर्ण परिचय | share market information in marathi pdf”