Mutual fund म्हणजे काय?
Mutual fund marathi
म्यूचअल फंड म्हणजे एक संस्था आपण असे म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये त्याला ट्रस्ट असे म्हणतात. या संस्थेचे कार्य लोकांकडून पैसा जमा करायचे व वेगळ्या सिक्युरिटीमध्ये त्या पैशांची गुंतवणूक करणे हे आहे. आजकाल काही गुंतवणूकदार शेअरमध्ये थेट गुंतवणूक करत नाही. पण अश्याच लोकांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आकर्षिले जाते त्यांना सोपे वाटते.याचे कारण म्हणजे बहुदा लोकांना शेअर बाजाराचे ज्ञान नसते. शेअर मार्केटची नीट माहीती नसते.तर शेअर बाजाराचा अभ्यास केलेला नसतो. म्हणून सामान्य लोक हे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास जास्त कल देतात. यातसुद्धा काही म्युच्युअल फंड शेअरमध्ये गुंतवणूक करतात तर काही सरकारी रोखांमध्ये गुंतवणूक करतात. तर काहींना दोन्ही सोपे वाटते.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे एखाद दुसरा शेअर घेणे नव्हे तर शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवणे. त्याकरता तितके पैसे हवेत, अभ्यास करून शेअर निवडायला हवेत, पोर्टफोलिओच्या कामगिरीवर लक्ष हवे. हे सगळे शक्य नाही, पण तरीही शेअर मार्केटमध्ये करायची आहे, त्यातील तेजीचा लाभ घ्यायचा आहे, हे शक्य आहे ? नक्कीच! हे शक्य होते इक्विटी म्युचुअल फंडांत गुंतवणूक करून. हे म्युचुअल फंड म्हणजे काय ते समजून घेऊ. म्युचुअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून ते सिक्युरिटीजमध्ये गुंतवणे ही एक सोपी व्याख्या सांगता येईल. असे पैसे जर त्या म्युचुअल फंडाने शेअर मार्केटमध्ये गुंतवले तर त्याला इक्विटी म्युचुअल फंड म्हणतात
Mutual fund marathi
गुंतवणूकदारांचा झालेला पैसा त्या म्युचुअल फंडाचे मॅनेजर शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. त्याकरता लागणारे ज्ञान, अभ्यास, त्यांच्याकडे असतो. तसेच आपल्याकडील रकमेतून आपण फार तर ५-६ कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकू. म्युच्युअल फंडाकडे मात्र सगळ्यांचा मिळून मोठा निधी जमत असल्याने ते अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशनचा लाभ मिळतो. समजा एका इक्विटी म्युचुअल फंडाकडे १००० कोटी रुपये जमा झाले. फंड या रकमेची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करेल. म्हणजे या रकमेतून अनेक कंपन्यांचे अनेक शेअर्स विकत घेईल.
या शेअर्सचे भाव जसे कमी-जास्त होतील तसे फंडाच्या गुंतवणुकीचे मूल्यही कमी-जास्त होईल.युनिट नेट अॅसेट व्हॅल्यू – एनएव्ही (नक्त मालमत्ता मूल्य) असतो. म्युचुअल फंडाच्या युनिटचे दर्शनी मूल्य १० रुपये असते, पण फंडाच्या कामगिरीनुसार या युनिटचे मूल्य म्हणजेच एनएव्ही किती ते ठरते. समजा फंडाच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य बरोबर दुप्पट झाले तर त्याचा एनएव्ही २० रुपये असेल, तिप्पट झालेले असेल तर त्याचा एनएसव्ही ३० रुपये असेल इत्यादी. आपण जेव्हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला त्या फंडाचे युनिट मिळतात, ते या एनएव्हीप्रमाणे मिळतात.
समजा एका फंडाचा एनएव्ही ३० रुपये आहे आणि आपण त्यात ३०,००० रुपये गुंतवले तर आपल्याला त्या फंडाचे ३०००० ३० बरोबर १००० युनिट मिळतील. हे युनिट आपण त्या म्युचुअल फंडाकडून विकत घेतो व रिडम्पशन (विमोचन) घेतानाही युनिट म्युचुअल फंडाला परत करतो व त्या वेळेस जो एनएव्ही असेल त्या प्रमाणात पैसे मिळतात. म्युचुअल फंड व म्युचुअल फंडांच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे हे आता लोकांना चांगलेच पटलेले आहे. या आधी उल्लेख केल्याप्रमाणे ऑक्टोबर २०१९मध्ये एसआयपीचे २.८९ कोटी अकाऊंट (खाती) होते व त्या एका महिन्यात ८२४६ कोटी रुपये रक्कमेची म्युचुअल फंडात गुंतवणूक केली गेली.
म्युचुअल फंड जेव्हा रोखेबाजारात गुंतवणूक करतो तेव्हा त्या फंडाला डेट म्युचुअल फंड म्हणतात. म्युचुअल फंडाचे इतरही काही प्रकार आहेत. त्या तपशिलात न जाता आता एक्सचेंज ट्रेडेड फंड (इटीएफ) म्हणजे काय ते बघू.
एक्सचेंज ट्रेडेड फंड (इटीएफ) म्हणजे काय?
Mutual fund marathi
एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे इटीएफ हा म्युचुअल फंडासारखा आहे, पण म्युचुअल फंड नाही. इटीएफ एखाद्या स्टॉकसारखा म्हणजे शेअरसारखा स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतो. जसे आपण शेअरची खरेदी-विक्री करतो त्याच पद्धतीने इटीएफचीही करू शकतो. इक्विटी म्युचुअल फंड त्याच्या मँडेटनुसार योग्य त्या व योग्य तितक्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतो. पण इटीएफ हा सेंसेक्स, निफ्टी किंवा अशासारख्या निर्देशांकांपैकी एका निर्देशांकाला रिप्रेझेंट करतो
Mutual fund marathiनिफ्टीवर आधारित असे इतरही काही म्युचुअल फंड कंपन्यांचे इटिएफ आहेत, तसेच सेंसेक्सवर आधारित निर्देशांकांवर व इतर काही निर्देशांकांवर आधारितही काही इटिएफ आहेत, उदाः बँक इंडेक्सवर आधारित इटिएफ, ज्युनियर इटिएफ, गोल्ड इटिएफ इत्यादी. या इटिएफचा उपयोग कसा लाभदायक होऊ शकतो ते बघू. एका कंपनीचे शेअर आपण घेतो तेव्हा त्या कंपनीची कामगिरी कशी असेल यावर आपण जोखीम घेत असतो. म्हणजे कंपनी स्पेसिफिक रिस्क. पण थेट सेंसेक्स किंवा निफ्टी यावर आधारित इटीएफमध्ये गुंतवूणक केली तर ही कंपनी स्पेसिफिक रिस्क कमी होते. एका कंपनीच्या शेअरचा भाव खाली आला तरी इतर शेअरचे वर गेलेले असू शकतात. कधी काही बातमी आल्यामुळे मार्केट म्हणजे सेंसेक्स आणि निफ्टी एकदम खाली येतात. त्यावर आधारित इटीएफचा भावही त्या प्रमाणात खाली येतो. त्या वेळेस इटीएफ खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. म्युचुअल फंडच्या युनिटचा एनएव्ही हा दिवसाअखेरीस ठरतो, तर इटीएफचा भाव म्हणजे मार्केटमध्ये त्या क्षणाला जो भाव असेल त्यानुसार असतो.
तेव्हा एकूणच पोर्टफोलिओ बनवण्याइतके पैसे नसतील, अभ्यास करून निवडणे शक्य नसेल, पण मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा खाली आलेले आहे त्याचा फायदा घ्यायचा आहे, तर इटीएफचा विचार अवश्य करावा
म्युच्युअल फंडाचे फायदे (Advantages of Mutual Fund)
Mutual fund marathi
या गुंतवणूकीत सुरूवातीला काही वेळेच्या अंतराने गुंतवणूक करावी लागते.म्हणून सिस्टमॅटीक योजना गुंतवणूकदारांच्या आवडती योजनापैकी एक आहे. या स्किममध्ये गुंतवणूक ही एक महिन्याची किंवा तीन महिन्याची करावी लागते. सर्वसाधारणपणे ५००० रूपये गुंतवणूक सुरूवातीला करायला लागते. आणि मग दर महिन्याला दुप्पट भरावे लागतात.सोपी गुंतवणूक करा आणि सोप्या रीतीने बाहेर पडा ( Easy Entry AND
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आणि बाहेर पडणे. हे खूप सोपे आहे. म्युच्युअल फंडात एक फॉर्म भरून देखील. खरेदी केल्यास चालते आणि दुसरा फॉर्म भरूनहीसुद्धा बाहेर जाता येते.परंतु शेअर खरेदी करण्यासाठी प्रथम शेअर दलालाकडे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.आणि त्यासाठी डिमेट अकाउंट लागते.