IPO म्हणजे काय? Share Market IPO Meaning in Marathi

IPO म्हणजे काय? Share Market IPO Meaning in Marathi

share market ipo meaning in marathi
share market ipo meaning in marathi

• आय पी ओ म्हणजे काय?

Share Market IPO Meaning in Marathi

IPO म्हणजे Initial Public Offer होय. जेव्हा एखादी कंपनी
शेअर मार्केटमध्ये नव्याने उतरत असेल तेव्हा त्या कंपनीला आपल्या शेअर्सची विक्री IPO द्वारे करावी लागते. IPO च्या माध्यमातून कंपनी थेट गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सची विक्री करून भांडवल उभारते व
गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स विकत घेतात.

• IPO ची प्रक्रिया

Share Market IPO Meaning in Marathi

ज्या कंपनीला शेअर मार्केट मध्ये आपले शेअर्स लिस्ट करून भांडवल उभारायचे असते, अशा कंपनीला सेबी (Securities and Exchange Board of India) तसेच अन्य संस्थांकडून परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर आपल्या कंपनीची सर्व माहिती व आयपीओ ची जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. आयपीओच्या जाहिरातीत कंपनीच्या आर्थिक स्थितीची माहिती द्यावी लागते. त्यानंतर कंपनी तीन दिवसाचा कालावधी ठरविते या तीन दिवसात गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओच ऑनलाइन फॉर्म भरतात. कंपनी शेअरचे वितरण करण्यासाठी लॉटरी पद्धतीचा वापर करतो. त्यानंतर ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स मिळालेले आहे त्यांच्या डिमॅट अकाउंट मध्ये ते शेअर्स क्रेडिट केले जातात. व ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांच्या पैसे परत केले जातात. त्यानंतर कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट होते.

• IPO चे फायदे

Share Market IPO Meaning in Marathi

आयपीओ म्हणजे एक प्रकारचे लॉटरी असते.आयपीओमध्ये अतिशय कमी कालावधीत व अतिशय कमी जोखीम घेऊन तुम्ही लखपती बनवू शकता. साधारणता अनेक आयपीओ मध्ये फक्त आठ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झालेले आहेत. शेअर मार्केटमध्ये अतिशय कमी कालावधीत मोठा पैसा आयपीओ द्वारे कमावता येतो. आयपीओ द्वारे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट सुद्धा होतात. परंतु यासाठी नशिबाची साथ आवश्यक असते, कारण आयपीओ लॉटरी पद्धतीने वितरित होत असल्यामुळे आयपीओमध्ये प्रत्येकाला शेअर्स मिळत नाहीत. तसेच अनेक आयपीओ मध्ये गुंतवणूकदारांना नुकसान झालेले आहे. त्यामुळे कोणत्याही आयपीओ मध्ये गुंतवणूक करताना सर्व माहिती घेणे आवश्यक असते.

कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणा्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जेव्हा भांडवल विस्ताराची अथवा नवीन कंपनीस भांडवल उभारायची गरज पडते,तेव्हा त्यांच्यासमोर पब्लिक लिमिटेड होणे हा एक पर्याय असतो,

पब्लिक लिमिटेड होताना कंपनीला स्वतःच्या मालकीचे विभाजन करावे लागते, आणि काही भाग (कमीत कमी ५१%) स्वतःकडे ठेवुन बाकीचा मालकी हाक्क भाग म्हणजेच शेअर्स हे बाजारात विक्रीसाठी काढावे लागतात. आणि ह्या शेअर भाग विक्रीमधून जे पैसे जमा होतात त्याचा वापर कंपनीच्या भांडवलासाठी केला जातो.

कोणतीही कंपनी जेव्हा पहिल्यांदा असे समभाग बाजारात विक्रीस काढते त्यास इनिशिअल पब्लिक ऑफेरींग म्हणजेच IPO (आय.पी.ओ.) असं म्हणतात. IPO मध्ये सामान्य गुंतवणूकदार हा थेट कंपनीकडून शेअर्स विकत घेतो. IPO विक्री च्या या प्रक्रियेत शेअर चा दर ठरवलेला असतो, तसेच Lot Size सुद्वा निश्चित केलेली असते (अर्थात एका गुंतवणूकदाराला किमान किती शेअर्स घ्यावे लागतात २०, ३०, ५० असे). एका lot ची किम्मत ही साधारणपणे १५००० रु. च्या आसपास असते. सामान्य गुंतवणूकदार कितीही Lot साठी Apply करू शकतो. IPO तून शेअर्स खरेदी करायचे असतील तर ते तुम्हाला ब्रोकरच्या माध्यमातून Apply करता येतं किंवा तुमच्या डिमॅट अकाउंट ला लिंक असलेल्या बँक खात्याचा Online Banking हा पर्याय वापरुन तुम्ही Apply करू शकता. IPO ला Apply केलं आहे म्हणजे तुम्हाला ते शेअर्स मिळतीलच असे नाही. ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते. जर तुम्हाला IPO मिळाला नाही तर गुंतवलेली पूर्ण रक्कम जशीच्या तशी तुमच्या बँक खात्यात परत केली जाते.

 

Leave a Comment